Posts

Showing posts from November, 2021
Image
  क्षयरोग- टीबी             टीबी हा एक प्राचीन काळापासून दुःख आणि मृत्यूचे प्रमुख कारण ठरला आहे, सर्वात जुन्या मानवी रोगांपैकी हा एक मानला जातो, गेल्या काही वर्षात क्षयरोगाचा केवळ वैद्यकीय परिणाम नव्हे, तर सामाजिक आर्थिक परिणाम सुद्धा प्रचंड दिसून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ अंदाजानुसार दरवर्षी सुमारे 10.4 दशलक्ष नवीन टीबी रुग्ण आढळतात आणि 1.8 दशलक्ष टीबी मुळे मृत्यू पावतात, या नवीन रुग्णांपैकी एक तृतीयांश सुमारे तीन दशलक्ष आरोग्य यंत्रणेला सापडत नाही आणि त्यातील अनेकांना योग्य उपचार मिळत नाही.संसर्गजन्य रोगांत पैकी क्षयरोगाचे दररोज चार हजारहून अधिक मृत्यू होतात,त्यामुळे तो अधिक घातक आहे. टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे, हा मुख्य तो फुप्फुसावर परिणाम करतो आणि त्याला फुप्फुसाचा टीबी म्हणतात, व जेव्हा तो  फुप्फुसा व्यतिरिक्त इतर शरीराच्या भागावर परिणाम करतो त्यास एक्स्ट्रा पल्मनरी किंवा फुप्फुसा व्यतिरिक्त टीबी म्हणतात. क्षयरोग हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो व त्यास प्रतिबंध ही करता ...