क्षयरोग- टीबी
टीबी हा एक प्राचीन काळापासून दुःख आणि मृत्यूचे प्रमुख कारण ठरला आहे, सर्वात जुन्या मानवी रोगांपैकी हा एक मानला जातो, गेल्या काही वर्षात क्षयरोगाचा केवळ वैद्यकीय परिणाम नव्हे, तर सामाजिक आर्थिक परिणाम सुद्धा प्रचंड दिसून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ अंदाजानुसार दरवर्षी सुमारे 10.4 दशलक्ष नवीन टीबी रुग्ण आढळतात आणि 1.8 दशलक्ष टीबी मुळे मृत्यू पावतात, या नवीन रुग्णांपैकी एक तृतीयांश सुमारे तीन दशलक्ष आरोग्य यंत्रणेला सापडत नाही आणि त्यातील अनेकांना योग्य उपचार मिळत नाही.संसर्गजन्य रोगांत पैकी क्षयरोगाचे दररोज चार हजारहून अधिक मृत्यू होतात,त्यामुळे तो अधिक घातक आहे.
टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा आजार आहे, हा मुख्य तो फुप्फुसावर परिणाम करतो आणि त्याला फुप्फुसाचा टीबी म्हणतात, व जेव्हा तो फुप्फुसा व्यतिरिक्त इतर शरीराच्या भागावर परिणाम करतो त्यास एक्स्ट्रा पल्मनरी किंवा फुप्फुसा व्यतिरिक्त टीबी म्हणतात. क्षयरोग हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो व त्यास प्रतिबंध ही करता येतात.
- महामारी शास्त्र Epidemiology
टीबी हा हजार हवेद्वारे एका टीबी रुग्णाकडून दुसऱ्या निरोगी व्यक्ती कडे पसरतो. फुप्फुसाचा टीबी असलेला व थुंकी दूषित असलेला रुग्ण जेव्हा खोकतो शिंकतो किंवा बोलतो तेव्हा त्याच्या तोंडातून टीबी चे जंतू हवेत पसरतात, एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्यासाठी त्यापैकी काही जंतू हवेद्वारे निरोगी व्यक्तीच्या शरीरात जाणे पुरेसे असते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला रोगाचा सक्रीय आजार होतो, तेव्हा त्याची मुख्य लक्षणे अशी असू शकतात संध्याकाळी ताप येणे, रात्री घाम येणे,वजन कमी होणे,भूक मंदावणे व शरीरामध्ये त्राण न राहणे. बराच काळ ही लक्षणं सौम्य पद्धतीचे असतात, त्यामुळे रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतो व त्याचा परिणाम आजार जास्त होण्यास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्यास विलंब होतो आणि परिणामी जिवाणू इतरांनाही प्रसार करू शकतो. सक्रीय टीबी असलेल्या रूग्ण एका वर्षाच्या कालावधीत औषध न घेता जवळच्या संपर्कात असलेल्या दहा ते पंधरा लोकांना संक्रमित करू शकतो. क्षयरोग हा आजार फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त शरीरातल्या दुसऱ्याही भागाला होऊ शकतो, उदाहरणार्थ आतड्यांचा क्षयरोग, हाडांचा क्षयरोग, मेंदूच्या आवरणाचा क्षयरोग. क्षयरोगामध्ये मुख्य लक्षणा बरोबर ज्या अवयवाला क्षयरोग होतो त्याची ही लक्षणे दिसतात, उदाहरणार्थ फुफ्फुसाचा असेल तर खोकला, आतड्यांचा असेल तर पोट दुखी, मेंदूचा असेल तर डोकेदुखी, अशी वेगवेगळी लक्षणे दिसतात त्या सगळ्या लक्षणांना वरून आपण त्या भागाचा क्षयरोग असल्याचे समजू शकतो व तशा पद्धतीने तपास करू शकतो.
टीबी विरोधी औषध अनेक दशकापासून वापरली जात आहेत, आणि सर्वेक्षण केलेल्या प्रत्येक देशात एक किंवा अधिक औषधांना प्रतिरोधक असलेला सट्रेनचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे, जेव्हा टिबी विरोधी औषध योग्यरीत्या वापरली जात नाहीत, आरोग्यसेवा त्यांच्या चुकीच्या प्रिस्क्रिप्शन द्वारे निकृष्ट औषध, आणि रुग्ण कालावधी पूर्वी उपचार थांबवतात, तेव्हा औषध प्रतिरोध टीबी होण्याची शक्यता वाढते.
- क्षयरोग निदान करण्याच्या पद्धती.
क्षयरोग हा आजार दीर्घकाळ चालणारा आजार आहे, त्याची लक्षणे दिसल्यानंतर त्याची पुढचा तपास म्हणून थुंकीचा चा तपास सूक्ष्मदर्शक मध्ये करावा, व त्याबरोबर एक्स-रे व काही नवीन तपास ही करणे गरजेचे आहे. बहू औषध प्रतिरोधक टीबी, एमडीआर टीबी हा एक टीबीचा प्रकार आहे, ज्यामध्ये टीबीचे जंतू वर पहिल्या श्रेणी च्या औषधाचा परिणाम होत नाही. एमडीआर टीबी सार्वजनिक आरोग्यासाठी आपत्ती व आरोग्य च्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करणारा आहे. यासाठी थुंकीचा तपास करणे जरुरी असते, ज्याला आपण कल्चर असे म्हणतात. कल्चर हा तपास दोन प्रकारचे असतात. त्यामध्ये phenotypic व genotypic असे प्रकार असतात. पहिल्या प्रकारच्या रिपोर्ट येण्यास जास्त वेळ लागतो व दुसऱ्या प्रकारांमध्ये ज्याला मॉलिक्युलर टेस्ट म्हणतात तो एक किंवा दोन दिवसाच्या आत येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारस केलेल्या जलद चाचण्या म्हणजे मॉलिक्युलर टेस्ट यांचा रिपोर्ट अतिशय लवकर येतो, व त्याने निदान लवकर होण्यास मदत होते. त्यामुळे पेशंटची उपचार लवकर सुरू करता येतो व त्यामुळे रुग्णाचा धोका टळतो.
बहु औषध प्रतिरोधक टीबी व प्रतिरोधक टीबीचे आणखीन प्रकार तसेच एचआयव्ही संबंधित टीबीचे निदान करणे जटिल आणि महाग असू शकते. लहान मुलांमध्ये क्षयरोगाचे निदान करणे विशेषता कठीण असते. सक्रिय औषध संवेदनशील टीबी रोगाचा उपचार चार प्रतिजैविक औषधाच्या मानक सहा महिन्याचा कोर्स द्वारे केला जातो, याची माहिती आरोग्य कर्मचारी किंवा प्रशिक्षित स्वयंसेवक का द्वारे रुग्णाला प्रदान केली जाते.
एचआयव्हीग्रस्त लोकांमध्ये एचआयव्ही नसलेल्या लोकांपेक्षा सक्रिय टीबी आजार होण्याची शक्यता 18 पट जास्त असते. एचआयव्ही आणि टीबी आजार हे दोन्ही प्राणघातक संयोजन तयार करतात, जे एकामेकाच्या प्रगतीला गती देतात.
- क्षयरोगावर उपचार करणाऱ्या पद्धती.
क्षयरोग हा आजार दोन प्रकारचे असतात त्यामध्ये औषध संवेदनशील व औषध प्रतिरोधी हे आहेत. संवेदनशील टीबीचा रोगाचे उपचार चार प्रतिजैविक औषधाच्या मानक सहा महिन्याचा कोर्स द्वारे केला जातो, व या औषधांना प्रथम श्रेणीचे औषध असे म्हटले जाते. दुसऱ्याशी श्रेणीची औषध महाग आणि एवढी प्रभावी नसतात त्यांचा उपचार कालावधी पण जास्त असू शकतो, ते एका वर्षापासून दोन वर्षापर्यंत दिली जातात, व बरे होण्याचे प्रमाण सुद्धा पहिल्या श्रेणीच्या औषधापेक्षा कमी असते.
- क्षयरोग प्रतिबंधक उपाय योजना.
बीसीजी लसीकरण, संशयित रुग्णाचे लवकरात लवकर निदान करणे, रुग्णाला पूर्ण उपचार देणे, रुग्णाला रोगाचे आरोग्यशिक्षण देणे.
डॉ. राजेंद्र ननावरे,
छाती, टीबी व मधुमेह तज्ञ.
Chest physician Group of TB hospitals Sewri Mumbai.
Editorial manager Indian journal of Tuberculosis.
Teacher, Lecturer and Examiner for Post graduate (post MBBS) Diploma and fellowship in Chest and TB. Tropical medicine and internal medicine College of physicians and surgeons Parel Mumbai.
Excellent, informative n very much useful article 👍👍👍.
ReplyDeleteThank you so much for your kind words.
DeleteVery very excellent information given by dr.nanware sir pl.watch every one
ReplyDeleteThank you so much for your kind words.
DeleteInformative even to ordinary people.
ReplyDeleteGREAT
Thank you so much for your kind words.
DeleteGood information,
ReplyDeleteIt’s important as well to aware people. Thank you sir.
Thank you so much for your valuable feedback.
DeleteIt's very informative, I hope such articles will remove all the misconception from people's minds.
ReplyDeleteGood information by Dr , it will increase awareness .
ReplyDeleteThank you so much for your valuable feedback.
DeleteComprehensive useful information about TB
ReplyDeleteThank you so much for your kind words.
DeleteGood information..
ReplyDeleteAwareness And making the basic healthcare requirements available to masses my lead society towards better and healty life.. Keep going sir
Thank you very much for your encouraging words.
Deleteखूपच सुंदर माहीती, सर्व सामान्यांना कळेल अशा भाषेत.
ReplyDeleteअशा अजून लेखांची अपेक्षा.
धन्यवाद. लवकरच नवीन लेख येतील. तोपर्यंत आपण http://drrajendrananavare.in/ या संकेतस्थळावर आणखी लेख वाचू शकता.
DeleteVery well written. Excellent information
ReplyDeleteDr Datta Panandikar
खूपच सोप्या आणि सामान्य मराठी माणसाला समजेल अशा शब्दांत मांडणी.
Deleteआपले लेख नेहमीच माहिती पूर्ण व उपयुक्त असतात.
धन्यवाद सर.
Thank you so much for your valuable feedback.
DeleteVery comprehensive and informative article.
ReplyDeleteThank you so much for your kind words.
DeleteVery nice 👍 information in simple language
ReplyDeleteThank you so much for your kind words.
DeleteDr आपण,छान प्रकारे विस्तृत माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteपहिले तर आभार dr. ननावरे सर ह्यान चे . आज माझी आई जो असहाह्या होणारा त्रास गेली काही १ वर्ष सहन करत होती आणि तो आजार dr ननावरे सर ह्यांनी १ महिन्यात बरा केला योग्य ते मार्गदर्शन करून . सर आपले आभार मानू इतके कमी आहेत🙏🏻
ReplyDeleteधन्यवाद.🙏🏻
Delete