Posts

Showing posts from April, 2022

क्षयरोग- टीबी

Image
  क्षयरोग- टीबी           गेल्या दोन दशकांत क्षयरोग नियंत्रणात प्रगती झाली असली तरीही, प्रत्यक्षात बाधित झालेले क्षयरोगी व उपचार घेत असलेले रोगी यांच्या संख्येत एक गंभीर दरी अद्यापही कायम आहे. जरी क्षयरोग उपचार करून पूर्णत: बरा होऊ शकतो, तरीही हा रोग आजही जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. गेली ९० वर्षे लसीकरण आणि ६० वर्षे औषधोपचार उपलब्ध असूनही, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस/अ‍ॅक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (HIV/AIDS) ह्या संसर्गजन्य रोगांमूळे होणार्‍या मृत्युंपेक्षा क्षयरोगांमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जगात अधिक दिसून येते. क्षयरोग (टीबी) हा जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. ह्या रोगाचा संसर्ग टाळता येण्यासारखा असूनही तसेच उपचाराने हा रोग पूर्णत: बरा करता येत असूनही, दररोज, ४,१०० हून अधिक लोक क्षयरोगाने आपला जीव गमावतात आणि जवळपास २८,००० लोक आजाराने बाधित होतात. वर्ष २०२० मध्ये, ९९ लाख लोक क्षयरोगाने बाधित झाले तर १५ लाख लोक मृत्युमुखी पडले.                अशा ह्या विनाशकारी क्षयरोगामुळे होणार्‍या आरोग्यसंबंधी, सामाजिक आणि आर