जागतिक फुफ्फुस दिवस २०२२: सर्वांसाठी निरोगी फुफ्फुस
          फुफ्फुसांचे मुख्य कार्य म्हणजे श्वसन करणे म्हणजेच श्वासोच्छवास प्रक्रियेद्वारे शरीरातील आवश्यक व अनावश्यक वायूंची देवाणघेवाण करणे. या प्रक्रियेत, श्वासाद्वारे आत येणाऱ्या वायुतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि हा शरीरास नको असलेला वायू उच्छवासाद्वारे बाहेर सोडला जातो. फुफ्फुसांचे अनारोग्य म्हणजे वायूची देवाणघेवाण करण्याची त्यांची क्षमता कमी होणे.           श्वसन मार्गातील आजारांमुळे जगात अकाली मृत्यू, क्षयरोग, साथीचा इन्फ्लूएन्झा आणि न्यूमोनिया यांसारखे आजार होत आहेत. याव्यतिरिक्त, ऍलर्जी, दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांचे वाढते प्रमाण श्वसन मार्गातील आजारांच्या यादीत अतिरिक्त योगदान करते.  २०२ ५ पर्यंत, जगभरात सिगारेट ओढणार्यांची संख्या 1.5 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तंबाखूशी संबंधित श्वसन मार्गाच्या आजारांमध्ये त्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.            श्वसनाचे आजार सर्व देशांतील सर्व स्तरातील लोकांमध्ये आढळतात तथापि कमी आणि मध्य...