तंबाखू व धुम्रपान भारतात तंबाखूचे सेवन हे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोक यासह अनेक जुनाट आजार व त्यामुळे होणारे मृत्यू यांचे एक प्रमुख कारण आहे ज्यामुळे दरवर्षी सुमारे १.३५ दशलक्ष मृत्यू होतात. भारत हा तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे. देशात विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया, २०१६-१७ नुसार भारतात जवळपास २६७ दशलक्ष प्रौढ (१५ वर्षे आणि त्यावरील) (सर्व प्रौढांपैकी २९%) तंबाखूचे सेवन करतात. भारतात तंबाखू सेवनाचे सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू उत्पादनांचे सेवन जसे - खैनी, गुटखा, तंबाखू आणि जर्दासह सुपारी. त्याचप्रमाणे बिडी, सिगरेट आणि हुक्का हे तंबाखू धूम्रपानाचे प्रकारही सर्रासपणे वापरले जातात. जागतिक स्तरावर, तंबाखूचा वापर हा सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. यामुळे केवळ जीवितहानीच होत नाही तर मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक खर्चही होतो. २०१७-१८ मध्ये भारतातील ३५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी तंबाखूच्या वापरामुळे झालेल्य...