क्षयरोग- टीबी

 

क्षयरोग- टीबी


        गेल्या दोन दशकांत क्षयरोग नियंत्रणात प्रगती झाली असली तरीही, प्रत्यक्षात बाधित झालेले क्षयरोगी व उपचार घेत असलेले रोगी यांच्या संख्येत एक गंभीर दरी अद्यापही कायम आहे. जरी क्षयरोग उपचार करून पूर्णत: बरा होऊ शकतो, तरीही हा रोग आजही जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. गेली ९० वर्षे लसीकरण आणि ६० वर्षे औषधोपचार उपलब्ध असूनही, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस/अ‍ॅक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (HIV/AIDS) ह्या संसर्गजन्य रोगांमूळे होणार्‍या मृत्युंपेक्षा क्षयरोगांमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जगात अधिक दिसून येते. क्षयरोग (टीबी) हा जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. ह्या रोगाचा संसर्ग टाळता येण्यासारखा असूनही तसेच उपचाराने हा रोग पूर्णत: बरा करता येत असूनही, दररोज, ४,१०० हून अधिक लोक क्षयरोगाने आपला जीव गमावतात आणि जवळपास २८,००० लोक आजाराने बाधित होतात. वर्ष २०२० मध्ये, ९९ लाख लोक क्षयरोगाने बाधित झाले तर १५ लाख लोक मृत्युमुखी पडले.

            अशा ह्या विनाशकारी क्षयरोगामुळे होणार्‍या आरोग्यसंबंधी, सामाजिक आणि आर्थिक परिणामांबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच जगातून क्षयरोगाचा संपूर्ण नायनाट करण्याच्या दृष्टीने होणार्‍या प्रयत्नांना गती देण्यासाठी आम्ही दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करतो. त्याचे कारण असे की १८८२ साली ह्याच तारखेला डॉ रॉबर्ट कोच यांनी टीबीला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावल्याचे घोषित करून या रोगाचे निदान आणि उपचार करण्याचा मार्ग खुला केला होता.

        क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (Mtb) ह्या जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग असून तो हवेद्वारे मानवांमध्ये प्रसारित होतो आणि सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो; तथापि, शरीराच्या कोणत्याही भागाला किंवा अवयवाला हानी पोहोचवू शकतो. संक्रमित झालेल्या ५ ते १०% व्यक्तीमध्ये हा रोग सक्रिय होऊ शकतो, सुमारे ५०% संक्रमित व्यक्तीमध्ये हा रोग दोन वर्षांत सक्रिय होऊ शकतो. संक्रमित व्यक्ती एचआयव्ही बाधित असल्यास त्याची रोगप्रतिकारक शक्ती मूलत: कमी होते, अशा व्यक्तींमध्ये क्षयरोग सक्रिय होण्याची शक्यता ६०% पेक्षा जास्त आहे.

            क्षयरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये क्षयरोगाचे निदान प्रामुख्याने संशयित रुग्णांच्या थुंकीच्या नमुन्याच्या सूक्ष्म तपासणीद्वारे केले जाते; तथापि क्षयरोगाच्या निदानासाठी वापरली जाणारी ही पद्धत सर्व प्रकरणांपैकी केवळ 50-60 टक्के प्रकरणे (स्मियर-पॉझिटिव्ह) शोधण्यात सक्षम आहे. क्षयरोगाचे निदान करण्याच्या आणि प्रतिरोधक औषधांचा शोध घेण्याच्या रेणू तपासण्यांसारख्या (Molecular Tests) अधिक संवेदनशील आणि जलद पद्धती अलीकडेच उपलब्ध झाल्या आहेत, मात्र त्या अधिक महाग आहेत.

        क्षयरोगाच्या उपचारासाठी किमान सहा महिन्यांपर्यंत विविध औषधांची आवश्यकता असते. विशेषत: जास्त प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये, जेथे स्थानिक संसाधनांपेक्षा रोगाचा संसर्ग जास्त आहे तेथे औषधोपचारासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी हा रूग्ण आणि तेथील आरोग्य सेवा प्रणाली ह्या दोघांसाठीही मोठे आव्हान आहे. काही भागांमध्ये, महागडी तसेच कमी परिणामकारक असलेली बाधक औषधे असल्याने प्रदीर्घ उपचार पद्धतींची आवश्यकता असते. आता नवीन औषधे आणि नियम उपलब्ध आहेत, जे कमी बाधक आणि अधिक प्रभावी आहेत. परंतु त्यांचा वापर अधिक विचारपूर्वक केला पाहिजे.

     क्षयरोगाचा मुकाबला करण्यासाठी, क्षयरोगाने बाधित असलेल्या तसेच आरोग्य सुविधांमध्ये उपचार घेत असलेल्या व्यक्तींना क्षयरोगाचे निदान करून उपचार प्रदान करणे हे मूलभूत धोरण गेल्या 40 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. परंतु हे धोरण क्षयरोगाची लक्षणे दिसून येत नसलेल्या सुप्त अवस्थेतील संसर्ग झालेल्या रुग्णांबाबत लागू करता येत नाही: मात्र अशा व्यक्तीमुळे भविष्यकालातील क्षयरोगाच्या संख्येत वाढ दिसुन येते. क्षयरोग नियंत्रणात प्रगती झाली असली तरीही, प्रत्यक्षात बाधित झालेले क्षयरोगी व उपचार घेत असलेले रोगी यांच्या संख्येत एक गंभीर दरी अद्यापही कायम आहे. क्षयरोगाच्या साथीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) जरी प्रयत्नशील असली, तरी क्षयरोग्यांच्या संख्येत झालेली प्रत्यक्ष घट निराशाजनक दिसून येते. क्षयरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये प्रत्येक तीन रूग्णांपैकी एक "आरोग्य व्यवस्थेसाठी अज्ञात" आढळतो, अनेकांचे निदान होत नाही आणि उपचार केले जात नाहीत, क्षयरोगाचे निदान आणि उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण अश देशांमध्ये खूप कमी आहे. क्षयरोगावरील उपचारासाठी वापरली जाणारी Isoniazid आणि Rifampicin ही दोन प्रमाणित औषधे उपचारासाठी प्रतिरोधक ठरत असल्याची संख्या जागतिक स्तरावर वाढत असल्याने ही एक मोठी चिंताजनक बाब आहे.

        जागतिक स्तरावर भारतात क्षयरोगाच्या संसर्गाचा (TBI) सर्वाधिक अंदाज आहे,

       जवळपास 35-40 कोटी  भारतीय लोकसंख्येमध्ये TBI आहे, ज्यापैकी 26 लाख  लोकांना (18-36 लाख) दरवर्षी क्षयरोग (टीबी) रोग होण्याची शक्यता आहे.

      सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण माहिती (Data) उपलब्ध झाल्यानंतर हे बदलू शकते.

      क्षयरोग नियंत्रणासाठी तीन अद्ययावत गोष्टींची आवश्यकता असेल – नवीन दक्षतापूर्वक निदान पद्धती विकसित करणे, औषध-संवेदनशील आणि औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचा सामना करण्यासाठी अधिक प्रभावी औषधप्रणाली विकसित करणे आणि तथाकथित सुप्त टीबीवर उपचार करण्यासाठी औषधोपचार व लसी विकसित करणे, ज्यामुळे एखादी व्यक्ती सुप्त क्षयरोगाने बाधित असल्यास त्याचे सक्रीय क्षयरोगात रुपांतर होण्यापासून प्रभावीपणे रोखता येईल.

  • सारांश

    अलीकडील पद्धतशीर पुनरावलोकनात असे दिसून आले आहे की भारतातील क्षयरोग रुग्णाला, निदान होण्यापूर्वी, सरासरी दोन महिने उशीर होतो आणि तीन आरोग्य सेवा प्रदात्यांना भेटी द्याव्या लागतात.अशा प्रकारे, भारतीय संदर्भात निदान विलंब सामान्य आहे.शिवाय, बहुसंख्य भारतीय टीबी रुग्णांची औषध-प्रतिरोधासाठी चाचणी होत नाही. संक्रमणाचे चक्र खंडित करण्यासाठी लवकर आणि अचूक निदान आणि जलद उपचार हे महत्वाचे आहे. या लेखाचा उद्देश सक्रिय क्षयरोगाचे निदान, औषध-प्रतिरोध, आणि गुप्त टीबी संसर्ग LTBI आणि योग्य उपचारांसाठी सर्वोत्तम पद्धतींचा सारांश प्रदान करणे हा आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आस्थमा हा दीर्घकालीन आजार आहे, व औषधाने नियंत्रित ठेवता येतो