डॉक्टर राजेंद्र तातू ननावरे यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉक्टर राजेंद्र तातू ननावरे यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले


A.C. भारत सरकार कुटुंब परिवार आणि गार्गीज डी आय डी फाउंडेशन आयोजित, राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2024. आदर्श डॉक्टर पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र तातू ननावरे.

डॉ. राजेंद्र तातु ननावरे हे मुंबई महाराष्ट्र राज्यातील प्रख्यात नामवंत छातीविकार तज्ञ असुन त्यांना महात्मा गांधी पीस फॉउंडेशन नेपाळ यांच्यावतीने सार्वजनिक आरोग्य सेवेतील त्यांच्या उच्च योगदानाबद्दल सन्मान तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक तत्वाचे पालन करणारे अनुयायी हया निकषावर त्यांच्या विशेष कार्याचा गौरव म्हणुन त्यांना प्रतिष्टीत डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात येत आहे.

जगाच्या नकाशा वरील सर्वात मोठया आशिया खंडातील मुंबईतील मोठया सार्वजनिक सेवेतील संसर्गजन्यरोग रुग्णालयात गेली 35 वर्षाहून अधिक काळ सेवा करून त्यांनी क्षयरुग्णांची सेवा करून त्यांनी आपल्या कार्याचा अवीट ठसा उमटवीला आहे. त्यांनी मुंबई मधील नामवंत ग्रुप ऑफ टीबी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक म्हणुन तसेच पी. जी. मध्ये विशेष प्राध्यापक म्हणुन उल्लेखनीय कार्यकाळ बजावुन उत्तम सेवा केलेली आहे. तसेच त्यांनी कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्स सीपीएस परेल मुंबई हया ठिकाणी उष्णकटीबंधीय औषध. छातीचे आजार आणि टीबीचे आजारातील उपचाराचे नेत्रदिपक कौशल्य हे प्रभावित प्रतिबिंबीत करते. डॉ. राजेंद्र ननावरे यांचे इंडियन जर्नल ऑफ टीबीचे संपादकीय योगदान आणि नॅशनल बेडाकिव्हलीन पायलट प्रकल्पातील योग्य नेतृत्व हे वैद्यकीय संशोधन आणि उपचारांच्या प्रगतीसाठी त्यांचे अधोरेखित महान कार्य सदैव समर्पित करते.

त्यांच्यातील व्यवसायिक प्रयत्नाच्या पलीकडे डॉ. राजेंद्र ननावरे यांना त्यांच्या मानवतावादी प्रत्यनांसाठी, मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना पाठींबा प्रोत्साहन देण्यासाठी विशेष करून ओळखले जाते. त्यांना अनेक सामाजिक संघटनाकडुन "भारत भुषण 'पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या सामाजिक सेवेचा अखंड वारसा समाजातील सर्व भावी पिढ्यानां तसेच बोद्ध सेवा आणि करुणा हया भावनेस सदैव प्रेरित प्रेरणादायी ठरेल असा आत्मविश्वास वाटतो.

विशेष करून प्रामुख्याने डॉ. राजेंद्र ननावरे यांना याव्यक्तीरिक्त शिक्षक दिनानिमित्त त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशनने एक प्रतिष्टीत प्राध्यापक म्हणुन गौरविण्यात येऊन सन्मानित करण्यात आले असुन त्यांना महाराष्ट्र राज्य IMA ने देखील सन 2023मध्ये त्यांना डॉक्टर दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ म्हणुन सन्मानित केले आहे. तसेच विशेष करून भारत सरकारने त्यांना 11फेब्रुवारी 2024रोजी त्यांच्या प्रशसंनिय कार्याची दखल घेऊन त्यांना "भारत भूषण 'पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.


माननीय प्रा.डॉ राजेंद्र ननावरे 
चेस्ट फिजिशियन आणि माजी वैद्यकीय अधीक्षक.ग्रुप ऑफ टीबी हॉस्पिटल्स शिवडी मुंबई.
कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन सीपीएस CPS. परेल मुंबईमध्ये छाती आणि क्षयरोग या विषयातील पदव्युत्तर पदविकासाठी प्राध्यापक. इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिसचे संपादकीय व्यवस्थापक.
ICMR च्या ड्रग सेफ्टी मॉनिटरिंग कमिटी मधील फार्माकोव्हिजिलन्स इन नवीन ड्रग बेडाक्विलिन २०१६-१९.राष्ट्रीय स्तरावर क्षयरोग आणि फुफ्फुसाच्या आजाराविरूद्ध युनियन इंटरनॅशनल युनियनमध्ये माजी सल्लागार.
माननीय प्राध्यापक IMA इंडियन मेडिकल असोसिएशन २०२२ पासून ५ वर्षे

Comments

Popular posts from this blog